फुलांनी रुसावे अशी कोमला तू  -  २
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू  -  २

तुझा मखमली स्पर्श वाऱ्यास होतो  -  २
वाहणे विसरतो तो धुंद होतो
कसा त्या कळावा तुझा गोड कावा ;
कुणीही फसावे अशी मृगजळा तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू  -  २

असे रुप लपवू नको फार आता  -  २
खुळा जाहला केशसंभार आता
मला गुंतू दे त्यात भ्रमरापरी गे ,
कितीदा पिऊ अक्षयी मधफुला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू  -  २
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू   -  २

युट्युब विडीओ लिंक  - you tube video link 

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

एक एक तो क्षण आला  -  २
तुझ्यातला माझ्यातला
सजून गेला आसवांनी ,
चिंब मज भिजवून गेला…
एक एक तो क्षण आला - २

झरुनी गेल्या क्षणसरींनी ,
अजुनी ओला मी सखेss
का असे झाले मला ते ,
सुख सखे गं पारखे
कोरडी झालीस तू तरी ,
अजुनी मी ओलावलाs …. 
एक एक तो क्षण आला - २

बेगडी दुनियेत माझ्या
भावनांचा खून झाला
वेदनांचा माझीया गे
ना कुणाला भार झाला
जाणवे तो सोनचाफा
त्या तुझ्या श्वासातलाs ….
एक एक तो क्षण आला - २

वेगळी व्याकुळता ही ,
आगळी आतुरता…
तोच मी अन् तीच तू तरी
का सुरांना आर्तता
जो दिला तू अर्थ त्यांना
तोच मी स्वीकारला …
एक एक तो क्षण आला - २
तुझ्यातला माझ्यातला
सजून गेला आसवांनी ,
चिंब मज भिजवून गेला !
एक एक तो क्षण आला - २

युट्युब विडीओ लिंक - you tube video link 

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

दयाघनाssss…  दयाघनाs ... दयाघनाs ... दयाघनाs ...
दयाघना  , दयाघना , दयाघनाs  , दयाघनाs …

माणसांच्या भर दुपारी काहिली जीवाची
दूरदूर नाही देवा खुण पावसाची
ओझे पेलून नभाचे पंख माझेही थकले रे
तोल माझा सावराया एक सावली हवी
 दयाघना रे … दयाघना रे … दयाघना
दयाघनाs  दयाघना  , दयाघनाs  दयाघना

{ सारे आहे हाताशी तरी रिते रिते भास
सावली हि या मनाची आणि तूच आसपास }  -  २
का रे आभाळ विकुन घर माझे बांधले रे
( ऋण वेडे हे फिटावे ) - २  आता कसे सांग ना
दयाघनाs  रे…  दयाघना … दयाघना रे… दयाघना

अंधारुनी मौन आले काळोखे किनारे  -  २
सावलीच्या सोबतीवर ( कोणाचे पहारे ) - २
कोण कोणाची तहान ; कुणी वहावे जरासे
जवळकीचे होई अंतर आणि दुरावे नवे
दयाघनाs  रे…  दयाघना … दयाघना रे… दयाघना

लाट आली…  एक मोठी…  संपले रे सारे
चांद घेऊनी गेला नात्यांचे पसारे
मी तुझ्याशी बोलतो कि बोलतो मी स्वतःशी
शोधताना मी स्वतःला आता कुठे चाललो रेss  ….
चाललो रेsss …………  चाललो रेsss ………
दयाघनाs  रे…  दयाघना … दयाघना रे… दयाघनाss

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

काs..  श्वास हाs...  अर्ध्यावरी गोठला
येs… धावूनीs …  अंधार हा दाटला
सांज ही..  सावळीs …  दाटते काजळी s
उरी मी बावराss …………….
काs..  श्वास हाs...  अर्ध्यावरी गोठला

आसपास कसे भास सावल्यात फिरणाsरे
आतआत कुणी रोज पाठलाग करणाsरे
पायी नाही जरी त्राण ; धावतोच तरी प्राणs
रे कुणी सावराs .. जीव हा घाबरा.. उन्हाने जाहलाs ..
काs..  श्वास हाs...  अर्ध्यावरी गोठला …

एकांताचं रान आता दूरवर पसरलं
होss सैरवैर पाचोळ्याचं वारं फिरे मनभर
पापण्यात ओलसर थेंबाथेंबाचा पाझरs
कोरडा.. मी पुन्हा… रे कसा जीवना… मला तू सांग नाss
काs..  श्वास हाs...  अर्ध्यावरी गोठला …

युट्युब विडीओ लिंक १ - you tube video link 1

युट्युब विडीओ लिंक २ - you tube video link  2

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

( वाऱ्याने जेव्हा माझे )  -  २  छप्परs उडविले होते… 
 वाऱ्याने जेव्हा माझे  छप्परs उडविले होते
( तेव्हापासून वाऱ्याशी ) -  २  माझे जडले नाते
 वाsऱ्याने जेव्हा माझे  छप्परs उडविले होते….
 वाsऱ्याने जेव्हा माझेs  ….……….

( मी क्षणभर का होईना )  -  २  काळीज सशाचे झालो
मी क्षणभर का होईना काळीज सशाचे झालो
गळणाऱ्या पानझडीने आभाळवेदना व्यालो
वाsऱ्याने जेव्हा माझे...   छप्परs उडविले होते….
वाsऱ्याने जेव्हा माझेs  ….……….

लपेटून चांदणे निजलो मीs सावलीत सूर्याच्या  -  २
मोकळ्या जाहल्याs  वाटा अन् काटेरी शब्दांच्या …
वाsऱ्याने जेव्हा माझे...  छप्परs उडविले होते….
वाsऱ्याने जेव्हा माझेs  ….……….

अंगणाने सोडिले अंग , भिंतीने दिला न थारा  - २
ओलांडून गावशिवेला ( मी होऊन गेलो वारा ) -  २
( वाऱ्याने जेव्हा माझे )  -  २  छप्परs उडविले होते… 
( तेव्हापासून वाऱ्याशी ) -  २  माझे जडले नाते
वाsऱ्याने जेव्हा माझे  छप्परs उडविले होते….
 वाsऱ्याने जेव्हा माझेs  ….……….

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

तू न यावे असे रोज भेटायला  -  २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला 
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला  …

कालच्या वेदना संपल्या ना जरी -  ३
का पुन्हा दुःख आलेच भांडायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला  …

सूर माझ्या गळ्याला छळू लागला  -  ३
पूर लागे हवेचाच दाटायला   -  २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला  …

का फुटे पालवी माळरानास या - ३
का ऋतू हा असा लागला गायला
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला  …

ओठ माझे मुके बोलली तू कुठे  - ३
ही गझल लागली आज बोलायला  -  २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला  …

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

 अबोल ना उदास मी   -  २
 तुझ्याsच आसपास मी
 अबोल ना उदाsस मी   -  २
 तुझ्याsच आसपास मी…
 अबोल ना….

 दरवळेs  मनी तुझ्या  - ३
 मोगरा सुवास मी  - २
 तुझ्याsच आसपास मी…
 अबोल ना उदाsस मी  
 तुझ्याsच आसपास मी…
 अबोल ना….

आठवांचा मीच सागर  -  ३
तृषार्त मी प्यास मी  -  २
तुझ्याsच आसपास मी…
अबोल ना उदाsस मी  
तुझ्याsच आसपास मी…
अबोल ना….

नाकारशी मला   -  ३
तुझाच श्वास श्वास मी - २
तुझ्याsच आसपास मी…
अबोल ना उदास मी  
तुझ्याsच आसपास मी…
अबोल ना….

आताच बोल तू गडे  -  ३
उद्या असेल भास मी  -  २
तुझ्याsच आसपास मी…
अबोल ना उदाsस मी   - २
तुझ्याsच आसपास मी…
अबोल ना…. -  ३

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

 चांदण्या रात्री…  अशांत वारा
 सहज स्मृतींच्या छेडील्या तारा

 चांदण्या रात्री…  अशांत वारा
 सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
 तुझ्याच आठवणींनी भरला आसमंत सारा
{ परत तुलाs  पाहताs  ; परत तुलाs  स्पर्शताs }  -  २
 या हृदयाला , मिळे निवारा ,
 सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
 चांदण्या रात्रीs  ……

{ जळालो गारव्यातही तुजला आठवताना
 नेत्र न थकले कधीही तुजला साठवताना } -  २
 हरवलोs …………   हरपलोs …………
 विसरलो स्वतःला कधी नभी बघताना
 तू मनी सदा हसताना वा रडताना ….
 { परत तुलाs  पाहताs  ; परत तुलाs  स्पर्शताs }  -  २
 या हृदयाला , मिळे निवारा ,
 सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
 चांदण्या रात्रीs  ….

 तुला पाहताsss …  परत तुला स्पर्शता….
 परत तुलाs....  पाहताs  ; परत तुलाs.....  स्पर्शताs

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

दारावरून माझ्या ,  त्यांची वरात गेली  -  २
( मेंदीत रंगलेली ) -  २  बरची उराsत गेली
दारावरून माझ्या ,  त्यांची वरात गेली

नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी  -  २
( आम्हीच लावलेली )  -  २  पणती धुराsत गेली
दारावरून माझ्या ,  त्यांची वरात गेली

मांडून सर्व जखमा मोजीत बैसलो मी   -  २
( बेवारशी व्यथांची ) -  २  वसती उराsत गेली
दारावरून माझ्या ,  त्यांची वरात गेली

आता कशास त्यांची पारायणे इलाही  -  २
 ( माझीच भाsग्यरेखा ) -  २  परक्या घराsत गेली
दारावरून माझ्या ,  त्यांची वरात गेली
 ( मेंदीत रंगलेली ) -  २  बरची उराsत गेली
दारावरून माझ्या ,  त्यांची वराssत गेली

युट्युब विडीओ लिंक - you tube video link

{ कोरस - छान किती दिसतें फुलपाखरू  }  -  ३
फुलपाखरू ….  ( छान किती दिसतें फुलपाखरू ) - २

( या वेलींवर… ) -  २  फुलांबरोबर…
 गोड किती हसते…   फुलपाखरू ss
 छान किती दिसतें फुलपाखरू

( डोळे बारीक ) -  २  करीती लुकलुक
 गोल मणी जणु ते ….  फुलपाखरूs
 छान किती दिसतें फुलपाखरू

(  मी धरु जाता…  )  -  २  येई न हाता
 दूरच ते उडते ….  फुलपाखरूss
 छान किती दिसतें फुलपाखरू

फुलपाखरू ….  ( छान किती दिसतें फुलपाखरूs  ) - २

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती  -  २
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती 
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती

{ तरी मी वाटतो नवानवा ; तरी मी वाटतो हवाहवा  }  - २
 भिजल्या सुरांत रुजतील माझी गाणी जुनी …
 उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती  -  २

{  बिलगून कोणी उभे… ह्या गच्च गार राती
  मग थरथरे ही काया अन् हात त्याच्या हाती  }  -  २
 स्पर्श माझा त्यांना आणि जवळ उगाचss
 तीही त्याचीs  … तोही तिचाs  … होऊन जाती …
 थेंबातुनी माझिया … कशी आज बरसे प्रीती
 उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती  -  २


{  माळरान दिसले कि उतरतो त्यावर
 गवताच्या  पात्यावर थेंबांची थरथर  }  -  २
 झाडाखाली गुरे ओली वाजतोय पावा -  २
 क्षण भिजलेले त्यांना …(  कसा घालू आवर  ) -  २

 होss खुळे _______  मन थेंब माझे न्हाती
{  उनाड पाऊस मी..  पल्याड माझी वस्ती 
   थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती  }  - २
{  तरी मी वाटतो नवानवा ; तरी मी वाटतो हवाहवा  }  - २
  भिजल्या सुरांत रुजतील माझी गाणी जुनी …
  उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्तीs   -  २

यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

वेडावल्या सुरांनी…  आभाळ चांदणे …
हातात थरथरावी… लाजून काकणे…
चाहूल येता अंतरातून काही उधाणते
असे रान ओले साद वेडी घालते
आज बेहोष बेधुंद वारा….
लाट ओलांडूनी हा किनारा….
चांदण राती कानी तुजला सांगते - आय लव्ह यू 
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू…. आय लव्ह यू

{  चांद हा… झाला जणू खुळा ;
  डोहात आपुले प्रतिबिंब आज पाहुनी }  -  २
 अलवार ही मिठी उमलून पाकळी
 छंदात या , रंगात या , जा रंगुनी
 आज बेहोष बेधुंद वारा ,
 लाट ओलांडूनी हा किनारा…
 चांदण राती कानी तुजला सांगते   - 
 आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू….

{  मोकळ्या…  केसात या तुझ्या .. ;
 हरवून जावू दे गंधाळल्या अशा क्षणी }  -  २
 वाटेत बावरा…  निशीगंध कोवळाs 
 श्वासातुनी स्पर्शातुनी तु साजणी
 आज बेहोष बेधुंद वारा ….
 लाट ओलांडूनी हा किनारा ….
चांदण राती कानी तुजला सांगते …

वेडावल्या सुरांनी आभाळ चांदणे
हातात थरथरावी लाजून काकणे
चाहूल येता अंतरातून काही उधाणते
असे रान ओले साद वेडी घालते
आज बेहोष बेधुंद वारा ….
लाट ओलांडूनी हा किनारा ….
चांदण राती कानी तुजला सांगते
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू….
 उsss   उउउउ आय लव्ह यू….



यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा……
अबोली फुलामध्ये ;
तशी तू माझ्या मनी
मोह बेधुंद तू मनाचा
विखरून चांदरात
काळजात माझियाs
मोहरेs - चेहरा तुझा …

सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचाss

हि साद त्या तारकांचीs 
हृदयी नक्षी तुझ्या रुपाची
टपटपतो मनी तुझाच मोगरा
तुझियासाठी होई जीव बावरा
विसरून या जगास आसपास मी तुझ्या
वाटतो आसरा तुझा

सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचाss

झुरतो झुलतो सदा थरारे
जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी ओथंबूनी
विरही सरही या जीवनी
भिजवून जा जीवनास माझिया
लागूदे … तुझी तृषा

सावली उन्हामधे ;
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचाss


यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

राधा राधा राधा राधा राधा राधा राधा - २
राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा - २
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा - २
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

{  व्हटं जनू  पिळलया डाळींबाच दानं 
 मोटं मोटं डोळं जशी कर्दळीची पानं  } - २
 कप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा
 राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा - २
 चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
 राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा
 राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

 कुनीतरी सांगा अशी रुसू नको बाई
 किस्नाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही
 कुनीतरी सांगा तिला रुसू नको बाई
 किस्नाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही
 गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा
 राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा
 चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
 राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा
 राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा - २
चंद्रावानी मुखडा तिचा - २
राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा - २
राधा राधा राधा माझी राधा कुठ गेली बघा - २



यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

अजब वाटे सारी दुनिया मला ऐसा होता है क्युं  
प्रश्न पडती हर क्षणाला मला ऐसा होता है क्युं  
चंद्र तारे शुभ्र सारे तरी दिसती फिके
येई मौनातून शहारे पण शब्द होती मुके
दिसता तू ….  डोंट नो व्हाय … ऐसा होता है क्युं  
(  कोरस - डोंट नो व्हाय , होता है क्युं    )
व्हेन आय सी यू … डोंट नो व्हाय… ऐसा होता है क्युं  
(  कोरस - डोंट नो व्हाय  ) - २

अजब वाटे सारी दुनिया मला ऐसा होता है क्युं  
(  कोरस - ऐसा होता है क्युं   )
प्रश्न पडती हर क्षणाला मला ऐसा होता ही क्युं  
गंध येई हा फुलांचा कुठून वाऱ्यासवे
श्वास होई धुंद माझा अन् स्वप्न दिसते नवे !
हसता तू … डोंट नो व्हाय … ऐसा होता है क्युं  
(  कोरस - डोंट नो व्हाय , होता है क्युं   )
व्हेन आय सी यू … डोंट नो व्हाय… ऐसा होता है क्युं
(  कोरस - डोंट नो व्हाय  ) - २

होई गर्दी आकाशातून हळूच मेघांची
ओढ या मातीला ही चिंब चिंब भिजण्याची
जन्मती ही गीतांमधूनी ही नाती जन्मांची
भास माझा कि प्रीत तुझीss …………

गंध येई हा फुलांचा कुठून वाऱ्यासवे
श्वास होई धुंद माझा अन् स्वप्न दिसते नवेs  !
अजब वाटे सारी दुनिया मला … (  कोरस - ऐसा होता है क्युं  )
हंs प्रश्न पडती हर क्षणाला मला… ( कोरस - ऐसा होता है क्युं  )
अजब वाटे सारी दुनिया मला ऐसा होता है क्युं
प्रश्न पडती हर क्षणाला मला ऐसा होता है क्युं
चंद्र तारे शुभ्र सारे तरी दिसती फिके
येई मौनातून शहारे पण शब्द होती मुके
दिसता तूssss  ( डोंट नो व्हाय  ) - २
(  कोरस - डोंट नो व्हाय  ) - २
टेल मी व्हाय , टेल मी व्हाय वोहो
टेल मी व्हाय होता है क्युं
बेबी व्हाय डोंट यु टेल मी ये होता है क्युं ….
(  कोरस - डोंट नो व्हाय  ) - २

यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

[ गीत आज मोहरते नवे
 साद या स्वरातून दे सखे
 मन तालामधेs  रंगले  ……
 का गुलाबी चढते नशा सांग ना
 { आज नादावला जीव हा }  -  २  ]  -  २

रंग नवा नवा उमलते पाकळी
सांज हसे गाली मोहरे सावळी
{  तुझ्या आठवांचा मेघ झुरे
 गंध केवड्याचा मागे उरे  }  - २
मन तालामध्ये रंगले…
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा }  -  २ 

प रे ग रे प रे ग रे रे ग म प ध प ग रे सा रे नि ध
म म म ध प ग ध प ग रे ध ग रे प ग रे सा रे सा रे
सा रे सा रे सा रे सा रे सा प प ध प ग प रे ग सा ग सा ग
म ग सा म ग सा रे म म ग प प रे म म ग प प

रात जरा जरा उतरली अंगणी
होs जीव होई खुळा मिलनाच्या क्षणी
{  कळी गुलाबाची गाली खुले
  मंद चांदण्यात घेई झुले  }  - २
मन तालामध्ये रंगले ….
का गुलाबी चढते नशा सांग ना
 {  आज नादावला जीव हा  }  -  २


 गीत आज मोहरते नवे
 साद या स्वरातून दे सखे
 मन तालामधेs  रंगले  ……
 का गुलाबी चढते नशा सांग ना
 { आज नादावला जीव हा }  -  ३


 युट्युब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

हे भास तुझे दिनरात असे
बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा कि गंध प्रिये
दरवळतो अवती भवती
उधळून मला मी गातो
ये साद सुरांनी देतो
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशाs 
{  तुझा ध्यास हि धुंद वेडी नशाs  } -  २

धुके पांघरुनी पहाटे पहाटे
तुझी याद माझा जीव जाळते
सुटे भान सारे दिशाभूल होते
तुझा गंध जेव्हा सांज माळते
हवासा हवासा तरी सोसवेना
तुझ्या आठवांचा ऋतू ओसरेना
आभास तुझा रिमझिमतो
हरवून मला मी जातो ….
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशाs 
{  तुझा ध्यास हि धुंद वेडी नशाs  } -  २

कधी चिंब राती उगा भास होती
तुझ्या चेहऱ्याने चांद हासतो
कधी पावलांचा तुझ्या नाद येतो
जीवाला नव्याने वेड लावतो
कसे सावरावे मनाला कळेना
उरी मेघ दाटे परी ओघळेना 
एकांत गुलाबी होतो ;
बहरून पुन्हा मी येतो …
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
{ तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा  } -  २

हे भास तुझे दिनरात असे
बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा कि गंध प्रिये
दरवळतो अवती भवती
उधळून मला मी गातो
ये साद सुरांनी देतो
चाहूल तुझी कि फसवी वेडी आशाs
{ तुझा ध्यास हि धुंद वेडी नशा  } -  ४



युट्युब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

तू मला पाहीले , मी तुला पाहीले - २
गुंतली लोचने भान ना राहिले …
तू मला पाहीले , मी तुला पाहीले ; 
गुंतली लोचने भान ना राहिले …
तू मला पाहीले , मी तुला पाहीले

{  गंध हा दरवळे… जीव हा विरघळे  } - २
 आठवांच्या तुझा , मेघ हा पाझरे
 थरथर ही स्वरातुनी ; गहिवर येई  दाटुनी
 मन हळवे मन हळवे फिरते कुठल्या धुंदीत हे ..
 तू मला पाहीले , मी तुला पाहीले ; 
 गुंतली लोचने भान ना राहिले …

हा शहारा नवा, शिरशिरी ही नवी - २
हा तुझा ध्यास की तूच तू भोवती
सरगम छेडतो जरी हरवून मी अधांतरी
रुणझुणती गुणगुणती , भवती फसवे भास तुझे
तू मला पाहीले , मी तुला पाहीले ; 
गुंतली लोचने भान ना राहिले …

तू मला पाहीले , मी तुला पाहीले
हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं

युट्युब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

पावसाचा भास होतो सांजवेळेला मलाऽ
आर्जवे मौनातली कळतील ना कधीही तुलाऽ
मन माझे हे नेतील पाखरे हीs ..
घन आणि हेमाहून साद ओली..
हळव्या दिशांना दे दिलासे याच प्रेमाचे !
हाय हाय अजुनही आहेत हाती भास स्पर्शाचे ;
चांदणे जाळीत जाते अजुन देहाचे..
पावसाचा भास होतो सांजवेळेला मलाऽऽऽ

हि तुझी चाहुल येते श्वास रोखुनी..
पावसाळी नजर , येती मेघ दाटुनी..
बांधले होते किनारी स्वप्न दोघांचे..
घर तुझे-माझे कसे गेलेच वाऽहूनी..
दे जराशी साद अन् सारेच सोडुन ये  !
आय हाय अजुनही आहेत हाती भास स्पर्शाचे ;
चांदणे जाळीत जाते अजुन देहाचे..
पावसाचा भास होतो सांजवेळेला मलाss

पावसाने लावलेली आग प्रेमाची..
वाटते आले कुणी का झुळूक वाऱ्‍याची..
मिटवूनी जा अंतरे ही थांबले क्षण हे..
सरुन जाऊदे दुरावे एकमेकांचे..
होऊनी तुफान ये अन् पार आता ने !
आय हाय अजुनही आहेत हाती....
चांदणे जाळीत जाते अजुन देहाचे..
पावसाचा भास होतो सांजवेळेला मलाss



युट्युब विडीओ लिंक - you tube video link

विडीओ डाउनलोड लिंक - video download link ( audio download is not available ) 

हो हो हो ओहोहो हो हो हो ओहोहो हो हो

[  {  सुख पावसापरी यावे, आयुष्य अन्‌ हे भिजावे }  - २
  स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
  जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग होsss .. हो हो हो हो हो
  घन आज बरसे मनावर हो...   घन आज बरसे अनावर हो.….
  चाहूल कुणाची त्यावर हो...  घन आज बरसे अनावर हो..… ] -  २

{  घेऊन गिरकी पानांवरती थेंब उतरले , 
वार्‍याच्याही पायी वाजती पैंजण ओले }  -  २
{  ही भूल सावळी पडे  }  -  २  झिरपले धुकेs …. हिरव्या रानावर हो..
घन आज बरसे मनावर हो..घन आज बरसे अनावर हो..
चाहूल कुणाची त्यावर हो… .. घन आज बरसे अनावर हो..

{ अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी  ;
 थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी }  -  २
{ तो गंध भारतो पुन्हा }  -  २ मनास वेड्या.. शिडकावा पानावर होssss ..
घन आज बरसे मनावर हो..घन आज बरसे अनावर हो..
चाहूल कुणाची त्यावर हो.. घन आज बरसे अनावर हो..


मिटले आताs  मधले अंतर….  पाऊस पडून गेल्यानंतर
घडून जाईल नाजुक ओले काही , मन होईल हळवे कातर
( पाऊस येईल पुन्हा ) -  २  नीज मोडाया …. मग येऊ भानावर हो..
घन आज बरसे मनावर हो.…. घन आज बरसे अनावर हो..
चाहूल सुखाची त्यावर हो..….  घन आज बरसे अनावर हो..

हो हो हो ओहोहो हो हो हो ओहोहो हो हो

युट्युब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download

{  धागिना तिनक धीन धागिनाती  }  -  २
 ( धागिना तिनक धीन ) - ३  धागिनाती

रूप तुझे अलवाsर ; रूप तुझे अलवार
कटीवर भार कळशीचा ;  नजर बोलकी फार
तळपता वार कटाक्षांचा ….
रूप तुझे अलवार , कटीवर भार कळशीचा ; 
नजर बोलकी फार  ; तळपता वार कटाक्षांचा ….

{  धागिना तिनक धीन धागिनाती  }  -  २
 हो रूप तुझे अलवाsssर ……

{  झळकता मोती …. विलगता ओठी … सूर प्रीतीचे … }  - २
{  मुखकमल बहरले … चांदणे फिके … पौर्णिमेचे  }  - २
{  धागिना तिनक धीन धागिनाती  }  -  ४
रूप तुझे अलवाsssर ……

तो-यात उभी जलधाsर , तो-यात उभी जलधार
अवखळ नार नख-याची , तू लावण्याची खाण ; रती गुलनार मदनाची
तो-यात उभी जलधार अवखळ नार नख-याची ,
तूs लावण्याची खाण ; रती गुलनार मदनाची
{  धागिना तिनक धीन धागिनाती  }  -  ४
रूप तुझे अलवाsssर ……

मूर्तिमंत सुंदरीss  …  मूर्तिमंत सुंदरी  ;
रंभाउर्वशी अवनीवरची ….….
शृंगार वल्लभाप्रति ; गुंगली मती … विधात्याची
मूर्तिमंत सुंदरी  ; रंभाउर्वशी अवनीवरची ….….
शृंगार वल्लभाप्रति ; गुंगली मती … विधात्याची
{  धागिना तिनक धीन धागिनाती  }  -  २

रूप तुझे अलवाssर ; रूप तुझे अलवार ;
कटीवर भार कळशीचा ;  नजर बोलकी फार
तळपता वार कटाक्षांचा ….
रूप तुझे अलवार , कटीवर भार कळशीचा ; 
नजर बोलकी फार  ; तळपता वार कटाक्षांचा …
{  धागिना तिनक धीन धागिनाती  }  -  २
रूप तुझे अलवाssssर … ( आलाप )






ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{  ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे  }  -  २
  चांदण्यांची सजवू  मैफिल मोगरीचे गंधवारे
  ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे

{  ओठ गाती प्रीतगाणे बहरले अवघे किनारे  }  - २
  शोधूनी त्या गंधकोषी प्राशूया मकरंद न्यारे
  चांदण्यांची सजवू  मैफिल मोगरीचे गंधवारे
  ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे

{  सूर कधीचे आठवेना… आळवितो मी तरीही  }  - २
   गुंफूनी सरगम निराळे झोकुनी दे सर्व तूही
   चांदण्यांची सजवू  मैफिल मोगरीचे गंधवारे
   ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे

{  दे कबुली या क्षणांची…  संपले काहीच नाही  } -  २
    सरत सरले गंधस्पर्शही , पण मनीची ओढ नाही
    चांदण्यांची सजवू  मैफिल मोगरीचे गंधवारे
{  ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे }  -  २

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

रानामधल्या मोsहफुलांचा दरवळला तो गंध एकदा
आठवले मज..  कुशीत माझ्या..  मोहरलीस तू प्रिये कितीकदा

रानामधल्या मोsहफुलांचा दरवळला तो गंध एकदा
आठवले मज..  कुशीत माझ्या..  मोsहरलीस तू प्रिये कितीकदा

{  रानामधले पलाsश फुलले  ;  रंग झळकते घेऊन झुलले  } -  २
 आठवले ते … कधी प्रियेचे … वस्त्र रेशमी सळसळलेले

{  पाने झरती , घेऊन गिरकी…  पाचोळ्यावर नाsद उमटती }  -  २
  मंद पहाटे… अवचित येता… नुपूर चोरटे तुझे छनकती
  रानामधल्या मोsहफुलांचा दरवळला तो गंध एकदा  , गंध एकदा …

{  रानामधल्या गर्द सावल्या एकांती मज भुलवून गेल्या  }  -  २
  पाठीवरच्या तुझ्या मोकळ्या केसांचे गुज सांगून गेल्या …

{  सायंकाळी ; निवांत वेळी…  रंग पश्चिमा बहरून उठली  }  -  २
  मुखकमलावर तुझ्या गुलाबी रंगपंचमी लाजून खुलली
  रानामधल्या मोsहफुलांचा दरवळला तो गंध एकदा  , गंध एकदा …

{  गर्द झावळ्या रानामधल्या , कातर क्षणा उभा एकला  }  -  २
 दाटून आली याद तुझी गं , संगतीस तू हवीस मजला …
रानामधल्या मोsहफुलांचा दरवळला तो गंध एकदा
आठवले मज..  कुशीत माझ्या..  मोहरलीस तू प्रिये कितीकदा

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link


{  तुला पाहताना ; तुला पाहताना  } -  २
 तुला पाहताना मनी काय वाटे
 इंद्रधनुचे नभी रंग दाटे ….
 कधी एक रंग नजर ती ठरेना
 असे काही दाटे तुला पाहताना

 { पहाटे पहाटे धुसरल्या वाटा ;
  कुठे रंग केशर उसळूनी लाटा }  - २
  तरुपल्लवी ती चमकली शलाका ;
  असे धुंद पृथ्वी तुला पाहताना
  ( तुला पाहताना  ; ) - ३

{  वसंतातला तो बहर अंबियाचा
  मधुर गंध दाटे सभोती तयाचा  }  - २
  साद स्वरांना कुहू कोकिळेचा ;
  ताल लयीचा तुला पाहताना
  ( तुला पाहताना  ; ) - ३

{  प्रथम पावसाचा असा मृदगंध
  मना केवड्याचा तो भुलवी सुगंध  }  - २
 निशिगंध व्हावे भिडे काळजाला ; 
 अशी धवलगंधा तुला पाहताना

{  तुला पाहताना ; तुला पाहताना  }  - २
  तुला पाहताना मनी काय वाटे
  इंद्रधनुचे नभी रंग दाटे ….
  कधी एक रंग नजर ती ठरेना
  असे काही दाटे तुला पाहताना




ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{  या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली  }  -  २
 ( ऐकतो आहे तुझ्या मी  ; ) - २  स्पंदनांच्या हालचाली
 या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली……

{  आज तू असशील जागी कवळूनी त्या आठवांना  }  -  २
 (  रात्रभर ऐकेन माझ्या  ) - २  जीवनाची मी खुशाली
  या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली……

{  ऐकली होती घराने त्या क्षणी चाहूल त्याची  } -  २
 (  पाऊले माझ्याकडे ती  ) -  २  यायला जेव्हा निघाली
{  या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली  }  -  २
 ( ऐकतो आहे तुझ्या मी ; ) - २  स्पंदनांच्या हालचाली
  या क्षणी आहे तुझ्या का मीच केsवळ भोवताली……
 ( मीच केsवळ भोवताली…… )  - २

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{ का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही  } - २
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
 का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही

{  वाsटते शब्दातुनी त्याच्या न मी लक्षात आता } - २
 पण तुला विसरून गेलो ;  तो असेही म्हणत नाही
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
 का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही

{  जाणतो मी खूप आहे प्रेम माझ्यावर तुझे पण ; }  - २
 काळजाचा माझिया ठोका…  कधी का चुकत नाही …
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
 का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही

{  भ्रष्ट केला माणसाने अंतरीचा आरसाही  }  - २
 देव पहिल्यासारखा आता कुणाला दिसत नाही
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
{  का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही  } - २


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{  तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे  }  - २
 तरी कधी पाळता न यावा ओठांचा जो प्रघात आहे
 तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे
 तुला कळावे मला कळावे …………………………

{  जरी भेटशी मिठीत माझ्या , तुला पाहतो दिशात दाही  }  - २
 ( तुझ्याचसाठी तुला सोडूनी ) - २  निघून मी दूर जात आहे
 तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे
 तुला कळावे मला कळावे …………………………

{  गुरफटती पायांतच वाटा अन् वाटांवर पाऊल भुलते  }  - २
 ( मला कळेना आयुष्याच्या ) - २  मी कुठल्या जंगलात आहे
 तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे
 तुला कळावे मला कळावे …………………………

{  उगाच का मी वणवण केली , उगाच का मी उनाड झालो  } - २
 (  कुणीतरी बोलले मला की ) -  २  तुझ्याकडे पारिजात आहे
{  तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे  }  - २
  तरी कधी पाळता न यावा ओठांचा जो प्रघात आहे
  तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे
  (  जे दोघांच्या मनात आहे ) - २



ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{  असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे  }  - २
गाता गाता… एके दिनी…  ( स्वयें पाऊसची व्हावे ) - २
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….

{ तनमन ओलेचिंब चिंब झाल्या आठवणी } -२
 ( फुटे मनाला धुमारे  ) - २  , नयनी ओढाळलं पाणी
{ डोळ्या पाणी पाणी वाणी ऐक पावसाची गं गाणी } - २
भोवताली झंजावात थांग नाही नाही कोणी
गाता गाता… एके दिनी…  स्वयें पाऊसची व्हावे
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….

उठे ढगांचा कल्लोळ…. घन सावळे गर्जून ….
सरीसरींचे नर्तन मन धावे ओथंबूनs 
पल्लवांचे हिरवे रावेs  साद देती कंठातूनs 
पावसाची गहिरी धून काळीज गं वेडावूनs
गाता गाता… एके दिनी…  स्वयें पाऊसची व्हावे
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….

{  उठे ढगांचा कल्लोळ उठवून शामधूळ } - २
 ( वेगे वाहताती ढग ) - २ ,  क्षितिजाशी हितगुजs
{ असे ढवळे सावळे घन झुके भूमीवर } - २  ;
सवे घेऊनीया थेंब मोती टपोर टपोर …
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….
गाता गाता… एके दिनी…  स्वयें पाऊसची व्हावे
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{  साsवरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी } - २
 ( याचसाठी चाsललो  ) - २  नाही तुला बिलगून मीsss
 साsवरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

{ आरशांच्या सारख्या भेटी मला देऊ नको  } - २
 ( पाहिला… आहे स्वतःचा … ) - २  चेहरा जवळून मी …
{  साsवरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी } - २ 

{ एकदा मी पाहिला अंधार माझ्यातला } - २
 ( मग कधी ना पाहिले ) - २ माझ्यात डोकावून मीss
{ साsवरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी } - २ 

{  तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा } - २
 ( यात माझे काय चुकले ) - २ जर दिले झोकून मी….
{  साsवरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी } - २
 ( याचसाठी चाsललो  ) - २  नाही तुला बिलगून मीsss
{  साsवरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी  }  -  २


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

थरार कोणता तुझ्या मनी थरारला ...
मनात चांदवा तुझ्या कसा शहारला ...
तुला जरासे समीप घेतले मी ...
हळूच जेव्हा तुला विचारले मीs  ,
" तुझा हा आरसा खरा कि सांग मी खरा ...
  कशात पाहशील तू तुझा हा चेहराss  ..."

{ हे कधी कळे न कोणतीs  आवडे मला तुझी अदाs  ...
जी आता तुझी मी पाहतोs ... जीव होई त्यावरी फिदा ...} - २
लागलो तुझ्या नशेत मी झुलाया ...
बोलती हे सारे वेडा झाला गेला वाया ...
थरार कोणता तुझ्या मनी थरारला ...
हेs मनात चांदवा तुझ्या कसा शहारलाssss  ...

{ राहुनी तुझ्या सभोवती मी किती तुला न्याहाळतो ...
आणि मग तुला हवे तसे नेमके मी तेच बोलतो ...}  - २
लागलो तुला मजेत गुणगुणाया ..
बोलती हे सारे वेडा झाला गेला वाया ...
{  थरार कोणता तुझ्या मनी थरारला ...
हे मनात चांदवा तुझ्या कसा शहारला ...
तुला जरासे समीप घेतले मी ...
हळूच जेव्हा तुला विचारले मीss   ) - २


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{ आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
 जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे } - २
 आsभास चांदण्याचा…… 

( तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती ) - २
 ही आगळी दिलेरी तव काजळात आहे
 जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
 आsभास चांदण्याचा…… 

 ( स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे ) - २
  चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे
  जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
  आsभास चांदण्याचा…… 

( संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी ) - २
 शराबीs  शराsबी  शराबीs  शराबीss 
 संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी ;
 केसात माळलेल्या या मोगर्‍यात आहे
 जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
 आsभास चांदण्याचा…… 

( ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे ) - २
 गाफिल यौवनाची संपूर्ण मात आहे
 जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
 आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
 जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
  आभाsस चांदण्याचा……

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

( अशा या सांजवेळेला सुखाचा गंध का आला ) - २
रिकाम्या ओंजळीला या फुलांचा भार का झाला
 अशा या सांजवेळेला सुखाचा गंध का आला

( निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छायाs ) - २
 निळ्या अंधाsर लाटेचा किनारा पैंजणेs  झाला
 अशा या सांजवेळेला सुखाचा गंध का आsला

( कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले ) -२
 मनाच्या स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला
 अशा या सांजवेळेला सुखाचा गंध का आला

( पहाटे स्वप्‍नपक्षांनी किनारे झाकले दोन्‍ही ) - २
 मिठीच्या वादळाकाठी उसासा चंदनी झाला
( अशा या सांजवेळेला सुखाचा गंध का आला ) - २
 रिकाम्या ओंजळीला या फुलांचा भार का झाला
( अशा या सांजवेळेला सुखाचा गंध का आला ) - २



ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{ जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना ...
अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना ...
तुटून गेलेत सर्व धागे आता कुणी न तुझा मी ...
विरून जातील प्राण माझे उद्या नसेन कुठेही ...
जळे हृदय माझे  …. कधी तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण…या जीवनाचे वाहायचे ओझे ...  } - २

कळे न कुठले तुफान आले लुटून नेले दिव्यांना ...
अनोळखी लागलो दिसु मी तुझ्याच मग डोळ्यांना ...
कशी तुझी ही नजर बदलली तुला कशास विचारू...
आता न फिरशील कधीच मागे तुला कशास पुकारू...
नव्या दिशा अन नवीन वाटा तुझा नवीन किनारा ...
दिलास तू सोबतीस मजला भयाण वादळ वारा ...
जळे हृदय माझे… कधी तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण…  या जीवनाचे वाहायचे ओझे ...

मनात जे एक स्वप्न होते तडेच त्याला गेले ...
जळून गेली तहान माझी तृषार्त ओठ जळाले ...
जरी कितीही पूर आसवाचे उरत माझ्या आले ...
टिपूस हि पापणीत नाही सुकून गेले डोळे...
उन्हात माझा प्रवास आता नसेल सोबत कोणी ...
कधीतरी सापडेल तुजला धुळीत माझी विराणी ...
जळे हृदय माझे कधी… तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण…  या जीवनाचे वाहायचे ओझे ...

जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना ...
अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना ...
तुटून गेलेत सर्व धागे आता कुणी न तुझा मी ...
विरून जातील प्राण माझे उद्या नसेन कुठेही ...
जळे हृदय माझे  …. कधी तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण…या जीवनाचे वाहायचे ओझे ...


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी - २
छंद हा गुलकंदी गं
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविनाsss
हात हाती तुझा दे ना 
{ डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंदी गं
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविनाsss
हात हाती तुझा दे ना } - २

{ नजरेला नजरेचा देशी तू नजराणा
 होतो मी तेव्हा दीवाsणा
सारे काही कळते मन माझे जळते
छळवादी तुझा हा बहाणा  } - २
{ वा-यावर झुलतो मी
 पंखाविण उडतो मी } - २
 सावर तू माझ्या मना
 किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविनाsss
 हात हाती तुझा दे ना
 डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी 
 छंद हा गुलकंदी गं
 किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविनाsss
 हात हाती तुझा दे ना 

{ बेधुंद बेहोश बेचैन हैराण
 होऊनी रात्रंदिनी मी
 मुखडा तुझा हसतो
 ठसका मनी ठसतो
 नाचे नशा रोमरोमी } - २
 घायाळ झालो मी
 हरलो ग हरलो मी
 होs  घायाळ झालो मी
 हरलो ग हरलो मी
नखरा तुझा सोड ना
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविनाsss
 हात हाती तुझा दे ना
 डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी 
 छंद हा गुलकंदी गं
 किती सुनसान बेभान राहू मी तुझ्याविनाsss
 हात हाती तुझा दे ना 

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू - २
( स्वप्नी अताशा ध्यास तुझा हा ) - २ कधी  गं  येशील  तूss   ..
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू ...

{ कधीचा उभा मी अशा या ठिकाणी हाती घेऊन तारे
 तुझ्या स्वागताला अडले इथेही सुगंधीत सारे वारे }  - २
तो चांद बरसण्या आतुर झाला ………………
चांद बरसण्या आतुर झाला ; कधी गं येशील तू  ..…
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू...

{ मनी स्पर्श होता तुझ्या चांदण्याचा मी न माझा उरतो
पुन्हा आठवूनी तुझ्या हसण्याला एकांती मी खुलतो } - २
( फुले तनु वर मोर पिसारा ) - २  कधी गं येशील तू  ..
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू...…
( स्वप्नी अताशा ध्यास तुझा हा )  - २ कधी गं येशील तू ..
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू...

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

{ मनात माझ्या होते … दोन शब्द ओळखीचे ...
 माझ्याशी बोलत होते … ते शब्द ओळखीचेs  ... }  - २
कधी ते गालावर नाचत होते ; डोळ्यांच्या मिठीतून शोधत होते ...
ओठांच्या पाकळीत , स्वप्नांच्या ओंजळीत होsते ...
मनात माझ्या होते ; दोन शब्द ओळखीचे ...
माझ्याशी बोलत होते ; ते शब्द ओळखीचेs  ...

{ हृदयाच्या काठावरून वाट कोणाची तरी पाहतो ...
 नजरेच्या वाटेवरून  कुठे कुणाला तरी शोधतो .. } - २
आकाशी या आठवणींचा करतो रोज पसारा ...
श्वासांच्या या लाटेवरूनी करतो एक इशारा ...
कधी ते गालावर नाचत होते ; डोळ्यांच्या मिठीतून शोधत होते ...
ओठांच्या पाकळीत ;  स्वप्नांच्या ओंजळीत होते ...
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे ...
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचे ...

{ एकटाच वाऱ्यासवे बेभान कुठे तरी धावतो ....
 सूर सारे गुंफून हा ओढ मनातली सांगतो ... } - २
ताऱ्यांशी हा गगनी जाऊन जोडून येतो नाते ...
त्या शब्दांना सजवून भोवती मन हे बहरून जाते...
कधी ते गालावर नाचत होते ; डोळ्यांच्या मिठीतून शोधत होते ...
ओठांच्या पाकळीत , स्वप्नांच्या ओंजळीत होते ...
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे ...
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचेs  ...

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

[ संगतीन माझ्या ढोल बजावे ;
धक धक माझा दिल धडकावे
तुझ्यावाचून मी कसे ग रहावे ;
हस जरा बस जरा बघ ना जरा तू ,
तूच माझी राणी तूच माझी मैना ;
भूल गया दिन साल महिना ,
बस में आता मन ये रहेना ;
काय करू काय करू बोल ना जरा तू ,
रोज रोज येते माझ्या स्वप्नात आणि मग ;
 मला वेडापिसा खुळा करतेस तू
{ आजा आजा कुडी अखिया लडायीले
आजा मेरे संग नच के दिखायीले
आजा आजा कुडी अखिया लडायीले
कर पोरी तू कमाल } - २ ]  - २



{ दिल दा मामला जुळू दे ना
अब के बरस मेरे यारा ;
बस तू बोल दे हां एक बार
चल चल संगतीनं माझ्या } - २
तुझ्या एका हसण्याने माझे ,
जग बघ उजळून गेले ;
हात तुझा दे ना कधी हाती
ये दिल किया तेरे हवाले ;
थांब थांब म्हणतेस , वेळ उगा काढतेस ,
जाता जाता जीवघेणी हसतेस तु
{ आजा आजा कुडी अखिया लडायीले
आजा मेरे संग नच के दिखायीले
आजा आजा कुडी अखिया लडायीले
कर पोरी तू कमाल } - २

छोटासा है दिल अपुला  ;
हिला बघ तिला बघ नाय जमणार ,
नजर सांगते काही तरी ;
ओठ अबोल हे कधी बोलणार ,
{ सारे तारे वारे तुझ्या पुढे मांडीन ;
चांदण्यांनी सा-या  तुझी रात सजवीन } - २
दूर नको जाऊ एकटा मी कसा राहू ;
मला जिथे पाहू तिथे दिसतेस तु...
{ आजा आजा कुडी अखिया लडायीले
आजा मेरे संग नच के दिखायीले
आजा आजा कुडी अखिया लडायीले
कर पोरी तू कमाल } - २

{ संगतीन माझ्या ढोल बजावे ;
धक धक माझा दिल धडकावे } - २
तुझ्यावाचून मी कसे ग रहावे ;
हस जरा बस जरा बघ ना जरा तू ,
तूच माझी राणी तूच माझी मैना ;
भूल गया दिन साल महिना ,
बस में आता मन ये रहेना ;
काय करू काय करू बोल ना जरा तू ,
रोज रोज येते माझ्या स्वप्नात आणि मग ;
 मला वेडापिसा खुळा……
{ आजा आजा कुडी अखिया लडायीले
आजा मेरे संग नच के दिखायीले
आजा आजा कुडी अखिया लडायीले
कर पोरी तू कमाल } - २


युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे ;
खुलवी तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह
तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह
मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे ;
खुलवी तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह
तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह
( तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ) - ३

{ अन् मेघ सावळे काय सांगती हे ....
की  नभी तुझे हे चित्र काढती गे ... } - २
हा किनारा तुझ्या आठवणीत बुडलाs ...
अन् उंच माड बघ तुला शोधती हेsss 
दूर ते तिथे तेच का तुझे गाव ओ माय लव्ह

मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे ;
खुलवी तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह
तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह

ह्या लाटा तुझिया देहावरच्याs नाsss ...
अन क्षितिज तुझ्या कमरेवर आहे नाss ...
हा मरुतस्पर्शही तुझाच होता नाsss
अन् धुंद गंधही तुझाच आहे नाssss
ह्या सागरी तुझ्या होई मन हे नाव ओ माय लव्ह 

मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे ;
खुलवी तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह  … ओ माय लव्ह
( तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह  … ओ माय लव्ह ) - ३
ओ माय लव्ह …

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers