{  या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली  }  -  २
 ( ऐकतो आहे तुझ्या मी  ; ) - २  स्पंदनांच्या हालचाली
 या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली……

{  आज तू असशील जागी कवळूनी त्या आठवांना  }  -  २
 (  रात्रभर ऐकेन माझ्या  ) - २  जीवनाची मी खुशाली
  या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली……

{  ऐकली होती घराने त्या क्षणी चाहूल त्याची  } -  २
 (  पाऊले माझ्याकडे ती  ) -  २  यायला जेव्हा निघाली
{  या क्षणी आहे तुझ्या का मीच केवळ भोवताली  }  -  २
 ( ऐकतो आहे तुझ्या मी ; ) - २  स्पंदनांच्या हालचाली
  या क्षणी आहे तुझ्या का मीच केsवळ भोवताली……
 ( मीच केsवळ भोवताली…… )  - २

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers