26
November

{ का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही  } - २
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
 का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही

{  वाsटते शब्दातुनी त्याच्या न मी लक्षात आता } - २
 पण तुला विसरून गेलो ;  तो असेही म्हणत नाही
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
 का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही

{  जाणतो मी खूप आहे प्रेम माझ्यावर तुझे पण ; }  - २
 काळजाचा माझिया ठोका…  कधी का चुकत नाही …
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
 का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही

{  भ्रष्ट केला माणसाने अंतरीचा आरसाही  }  - २
 देव पहिल्यासारखा आता कुणाला दिसत नाही
 याsर पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही ….
{  का… कधी… येथेs  कुणाचेही कुणाशी जमत नाही  } - २

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers