प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू - २
( स्वप्नी अताशा ध्यास तुझा हा ) - २ कधी  गं  येशील  तूss   ..
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू ...

{ कधीचा उभा मी अशा या ठिकाणी हाती घेऊन तारे
 तुझ्या स्वागताला अडले इथेही सुगंधीत सारे वारे }  - २
तो चांद बरसण्या आतुर झाला ………………
चांद बरसण्या आतुर झाला ; कधी गं येशील तू  ..…
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू...

{ मनी स्पर्श होता तुझ्या चांदण्याचा मी न माझा उरतो
पुन्हा आठवूनी तुझ्या हसण्याला एकांती मी खुलतो } - २
( फुले तनु वर मोर पिसारा ) - २  कधी गं येशील तू  ..
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू...…
( स्वप्नी अताशा ध्यास तुझा हा )  - २ कधी गं येशील तू ..
प्रेमात पडलो तुझ्या मी आता कधी गं येशील तू...

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers