23
December

स्वप्नाप्रमाणे का वाटते सारे
प्रेमधून हळवी छेडताना
सुटले उखाणे गंधित भासांचे
नाते गुलाबी जोडताना
मोरपंखी स्पर्श झालेs
सावल्यांना रंग आलेs 
मोगऱ्याने श्वास न्हालेs
पैजणांचा नाद बोलेs  …
{  हिs  नशा …. ओढ नवी दर्द हवासा } - २

कोवळ्या मनाचे फुलपाखरू झाले
पंख वाऱ्याचे लावताना
हुरहूर थोडी…  थोडा दिलासा हा
आभास फसवे छळतात का
हे कुणाचे शब्द ओठीs
का नव्याने याद येतीs
सप्तरंगी गीत गातीs
ओळखीची साद देतीs
{  हिs  नशा …. ओढ नवी दर्द हवासा }  -  २

या मनाचे … त्या मनाशी
जुळले कसे हे आज रे धागे नवे
स्पंदनांचे स्पंदनांना
कळले आता हे अर्थ रे वेडेपिसे
कोणी परके खास व्हावेs
दूरवरचे पास यावेs
चाहुलींनी दरवळावेs
या क्षणाशी गुणगुणावेs
{  हिs  नशा …. ओढ नवी दर्द हवासा }  -  २

बदलून गेले अंदाज जगण्याचे
हरवून येतो मी स्वतःला
सुखाच्या सरींचे ओले शहारे हे
हळुवार मौसम … उमलताना
अंथरावे पाकळ्यांनाs
पांघरावे चांदण्यांनाs
नीज येत पापण्यांनाs
जाग यावी भावनांनाs
{  हिs  नशा …. ओढ नवी दर्द हवासा }  -  २


 ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

23
December

{  तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी  } - २ 
{ चांदणे माझ्या मनीचे , पसरले क्षितीजावरी }  -  फिमेल वॉईस
 तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी
{ चांदणे माझ्या मनीचे , पसरले क्षितीजावरी }  -  फिमेल वॉईस
 तू निरागस चंsद्रमा …….


{  काजळाचे बोट घे तू लावूनी गालावरी  }  - २
{  मनमनीचे भाव सारे उमलले चेहऱ्यावरी  }  - फिमेल वॉईस
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
{  शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी } -  फिमेल वॉईस
 तू निरागस चंsद्रमा …….

{  सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी }  - २
{  भोवतीचे तेच सारे ….  वाटते दुनिया नवी } - फिमेल वॉईस
हासता तू सूरही झंकारले वाऱ्यावरी
{  मी न माझी राहिले ही नशा जादुभरी  }  - फिमेल वॉईस
 तू निरागस चंsद्रमा …….


युट्युब विडीओ लिंक  - you tube video link 


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link


22
December

चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही….
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई..........
चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही…

सये अशी तू हळूच येऊन ;
मग पुन्हा मला बिलगावे
होss  सूर काहीसे हळवे आतुर
माझ्यापाशी मागावे …
पुसून जाईल मधले अंतर
उरले दोघां  ( भानच नाही  ) - २
हात तुझा हा असावा हाती
नजर सांगते ( गहिरे काही ) - २

{  (  चांद तळ्यात ) - ३   वाकून पाही
रात सरेना तशीच राही….
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई........ }  - फिमेल वॉईस

{ (  शब्दांच्या पल्याड काही नजर सांगते तुझी
मालवून चंद्र जरासा लाजते मी अशी  ) - २
श्वासामधूनीs  वाहत राही … चांदण्यातली ( रात प्रवाही )  - २  } - फिमेल वॉईस

चांद तळ्यात …. चांद तळ्यात …
{  चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही…. } - फिमेल वॉईस
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई..........

{  वेडे रेशमी नाते कसे येई जुळून...}  - फिमेल वॉईस
कधी होई पहाट , आले नाही कळून
 वेडे रेशमी नाते कसे येई जुळून...
{  कधी होई पहाट , आले नाही कळून }  - फिमेल वॉईस
रूप तुझे खुलूsन येई
प्रीत बावरी अबोल होई.........
अबोल होई......... अबोल होई.........

  ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

22
December

( अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे )  - २   आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना, ( सांग ना रे मना ) - ४

(  श्वास गंधाळती, शब्द भांबावती , रोमरोमांतली कंपने बोलती } -   फिमेल वॉईस
मोहरे - मोहरे…  पाकळी-पाकळी , भारलेल्या जीवा…  आवरावे किती
{  का अशा जागल्या सांग संवेदना  , ( सांग ना रे मना ) - ४ }  - फिमेल वॉईस

हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली  , ऐकू येs  कोठुनीs   साद ही मलमली
{  गोठले श्वास अन्‌ स्पंदने थांबली , हे शहाsरे जणू रेशमाsच्या झुली } -   फिमेल वॉईस
आज ओथंबल्या का अशा भावना  ,  ( सांग ना रे मना ) - ४
{   सांग ना रे मना  , सांग ना रे मना  }   -  फिमेल वॉईस 
 सांग ना रे मना  , सांग ना रे मना 
{   सांग ना रे मना  , सांग ना रे मना  }   -  फिमेल वॉईस


 ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

22
December

 दिवसामागून दिवस चालले……
{  दिवसामागून दिवस चालले , तशीच वर्षे जाती }  -  २
ही काळाची गती रोखणे (  नसे कुणाच्या हाती )  - २
 दिवसामागून दिवस चालले

{ सुखदुःखाच्या उनसावल्या लांब लांब ही वाट  }  - २
वाटेवर या रोज वेगळ्या ( वाटसरूंशी गाठ ) -२
( कधी कुणाशी वैर…. ) - २  , (  कुणाशी जुळती रेशीमगाठी ) - २ 
 ( नसे कुणाच्या हाती ) - २  दिवसामागून दिवस चालले ….


{ असे भेटले किती सोबती कसे आठवू आता }  - २
तरी राहिले मनात काही  ( सोडून जाता जाता ) - २
(  निवांत वेळी …. ) - २  आठवती मग ( अशी अनामिक नाती ) - २
( नसे कुणाच्या हाती ) - २  दिवसामागून दिवस चालले ….

{  कधी सूर्य तो सायंकाळी अस्ताला जाताना  }  - २
विरहगीतही आर्त स्वरांनी (  दूर कुणी गाताना ) - २
( कुठेतरी मग भिजतील डोळे ) - २ (  रोज कुणाच्या साठी ) - २
( नसे कुणाच्या हाती ) - २  दिवसामागून दिवस चालले ….

22
December

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे

एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, साऱ्यात तूss
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तूss

पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही  हे नाते नवे … अजब रीत ही स्वप्न नवे

या भोवताली…  काही दिसेना
तू आणि मी , मी आणि तू  …. बाकी उरेनाs 
होतो कुठे अन् … आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा , काही कळेना 

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे

 ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

22
December

दूsर…….  दूsर……

{  दूssर कोठेतरी सांsज ढळताना } - २
साsद घाली कुणी …. हे साsद घाली कुणी …
 राsत सजताना   (  दूsर दूsर दूsर कोठेतरीs …  ) - २

{  सांज पाऊस हा तुझ्या डोळ्यातला
आला दाटून हा शब्द कंठातला }  - २
{ काही न सांगता तू  ;  काही न बोलता तू  }  -२ 
वाहते वारे मनातले
वाहतो मी जळताना
(  दूsर दूsर दूsर कोठेतरी ) - २


{  आशा निराशांचे तोडून शिशे किती
काहूर मनातले आता वाटे भीती } - २
{  निःशब्द हि भावना ; निःशब्द हि यातना }  - २
घेऊन आस उभी तू चांदराती भिजताना
(  दूsर दूsर दूsर कोठेतरी ) - २

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers