23
December

{  तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी  } - २ 
{ चांदणे माझ्या मनीचे , पसरले क्षितीजावरी }  -  फिमेल वॉईस
 तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी
{ चांदणे माझ्या मनीचे , पसरले क्षितीजावरी }  -  फिमेल वॉईस
 तू निरागस चंsद्रमा …….


{  काजळाचे बोट घे तू लावूनी गालावरी  }  - २
{  मनमनीचे भाव सारे उमलले चेहऱ्यावरी  }  - फिमेल वॉईस
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
{  शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी } -  फिमेल वॉईस
 तू निरागस चंsद्रमा …….

{  सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी }  - २
{  भोवतीचे तेच सारे ….  वाटते दुनिया नवी } - फिमेल वॉईस
हासता तू सूरही झंकारले वाऱ्यावरी
{  मी न माझी राहिले ही नशा जादुभरी  }  - फिमेल वॉईस
 तू निरागस चंsद्रमा …….


युट्युब विडीओ लिंक  - you tube video link 


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link


0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers