22
December

 दिवसामागून दिवस चालले……
{  दिवसामागून दिवस चालले , तशीच वर्षे जाती }  -  २
ही काळाची गती रोखणे (  नसे कुणाच्या हाती )  - २
 दिवसामागून दिवस चालले

{ सुखदुःखाच्या उनसावल्या लांब लांब ही वाट  }  - २
वाटेवर या रोज वेगळ्या ( वाटसरूंशी गाठ ) -२
( कधी कुणाशी वैर…. ) - २  , (  कुणाशी जुळती रेशीमगाठी ) - २ 
 ( नसे कुणाच्या हाती ) - २  दिवसामागून दिवस चालले ….


{ असे भेटले किती सोबती कसे आठवू आता }  - २
तरी राहिले मनात काही  ( सोडून जाता जाता ) - २
(  निवांत वेळी …. ) - २  आठवती मग ( अशी अनामिक नाती ) - २
( नसे कुणाच्या हाती ) - २  दिवसामागून दिवस चालले ….

{  कधी सूर्य तो सायंकाळी अस्ताला जाताना  }  - २
विरहगीतही आर्त स्वरांनी (  दूर कुणी गाताना ) - २
( कुठेतरी मग भिजतील डोळे ) - २ (  रोज कुणाच्या साठी ) - २
( नसे कुणाच्या हाती ) - २  दिवसामागून दिवस चालले ….

0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers