{  स्वप्नातली तू परी
  अलवारशी बासरीs
  तुझ्यात सप्तसूर माझेs
  झुरे निशा बावरीs   }  -  २

{  सये निशा अशी दीवाणीs
   मिठीत स्वप्न जागतो मीs
   मधाळ वेळ मिलनाची
   मधाळ चंद्र चोरतो मी   } - २
   अधरे..  जुळली… ;
   या मिठीत बावरी
   स्वप्नातली तू परी
   अलवारशी बासरीs
   तुझ्यात सप्तसूर माझेs
   झुरे निशा बावरी

 {  गुलाबी स्वप्न कोवळेसे
    गुलाबी रंग या कळीचे
    अधीर श्वास शोधत आहे
    गुलाबी गंध ओळखीचे  } - २
    फुलला..  हळवा… ;
    हा गुलाब अंतरी
    स्वप्नातली तू परी...…
    अलवारशी बासरीs
    तुझ्यात सप्तसूर माझेs
     झुरे निशा बावरी

{  तुझेच स्वप्न पाहताना
   तुला तुलाच शोधताना
   प्रिये तुझाच भास आहे
   कवेत रात्र ओढताना   }  -  २
   बघ ना .. वळूनी…. ;
   चांदणी ही लाजली
   स्वप्नातली तू परी
   अलवारशी बासरी
   तुझ्यात सप्तसूर माझे
    झुरे निशा…  बावरी…

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

युट्युब विडीओ लिंक - you tube video link


 कधी कसे कुठे भेटलो आपण  -  २
 अजुनी वेचतो मी ते क्षण कण  -  २
 कधी कसे कुठे भेटलो आपण  -  २

 जरी एकटा मी भासे तुला  ;
 तुला आठविता नसे एकटा
 गीत हे तुझे ; तुजलाच अर्पण  -  २
 अजुनी वेचतो मी ते क्षण कण 
 कधी कसे कुठे भेटलो आपण  -  २

 अजुनी वेचतो मी ते क्षण कण  -  २

{ तुझा छंद जेंव्हा मला लागला,
 तुझ्यावीण काही सुचेना मला }  -  २
 शिशिरात बरसावा रिमझिमता श्रावण  -  २ 
 अजुनी वेचतो मी ते क्षण कण   -  २

{ एक मी सांगतो तू ऐकून घे,
 शब्द मी तुजला दिला हा गे }  -  २
 यापुढचे सारे होतील क्षण सण  -  २
 अजुनी वेचतो मी ते क्षण कण  -  २
 कधी कसे कुठे भेटलो आपण  -  २

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

युट्युब विडीओ लिंक - you tube video link

ऐक जराsss चल साठवूया नि आठवू या क्षणांना
माझ्या तुझ्या त्या मिठीतल्या चांदण्यालाss

{ चल सोबतीनेच जाऊ ; एकाच स्वप्नात राहू
 नशिबास थोडेसे मनवू , सोपा करू रस्ता } -  फिमेल वॉईस

ऐक जराss चल साठवूया नि आठवू या क्षणांना
माझ्या तुझ्या त्या मिठीतल्या चांदण्यालाss
रात अशीs  सरतानाs  ;  सरतानाs 
{  सरतानाs  …… सरतानाs  }  -  फिमेल वॉईस

मोजुयाs  सरलेल्या आठवणींची खोली
आणूयाs  सोनेरी किरणे थोडी ओली

{  चल सोबतीनेच जाऊ ; एकाच स्वप्नात राहू
  नशिबास थोडेसे मनवू , सोपा करू रस्ता  }  -  फिमेल वॉईस

थांब जराsss ; राहून गेलेले आज होऊन जाताs
बेभान होऊनी जाऊ दोघेही आताs
रात अशीs  सरतानाs  ;  सरतानाs 
सरतानाs  ……  सरतानाs



ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

युट्युब विडीओ लिंक - you tube video link

येते जाते , जातेs येते…  वाऱ्याची लकेर  -  २
संगतीने साजणीच्या गाणे नवे झरेलss
येते जाते , जातेs येते…  वाऱ्याची लकेर 

चाहुली निळ्या निळ्या , निळ्या नभात दाटल्या  -  २
गोऱ्यामोऱ्या चांदणीला चंद्र खुणा करेल
येते जाते , जातेs येते…  वाऱ्याची लकेर 

स्पर्श रेशमापरी… भाव मुग्धमाधुरी  -  २
मदिरपेला ओठातला ओठी नशा भरेलs
येते जाते , जातेs येते…  वाऱ्याची लकेर 

स्वप्नं सारी घेउनी ,  हात हाती गुंफूनी  -  २
चल जाऊ दूर कुठे … वाट  ठरेल …
येते जाते , जातेs येते…  वाऱ्याची लकेर   - २
संगतीने साजणीच्या गाणे नवे झरेलss
येते जाते , जातेs येते…  वाऱ्याची लकेर

ऑडीओ डाऊनलोड लिंक - audio download link

तोs  नभातूनी भरारतो
अबोल पारवा निःसंग तो
नभातूनी भरारतो….
अबोल पारवा निःसंग तो
कधी इथे कधी तिथे
विलोलसा भरारतो
तोs  नभातूनी भरारतो
अबोल पारवा निःसंग तो
नभातूनी भरारतो….

{ हिरव्याs  वनात दाट
 डुलती पाचू लोलकात }  -  २
 लवलवत्या… ; दुधभरल्या ;
 शेतावर पळभर नच रमतो
 तोs  नभातूनी भरारतो
 अबोल पारवा निःसंग तो
 नभातूनी भरारतो….

{ तांबडया फळात जर्द
 रस भरे चुटूकलाल  }  -  २
 चिवचिवते… ; किलबिलते ;
 नवथर साद , तरीही न घुमतो
 तोs  नभातूनी भरारतो
 अबोल पारवा निःसंग तो
 नभातूनी भरारतो….

{ वाहत्या निळ्या नदीस
 गडद शांत सागरास  }  -  २
 जलभरले… ; मेघ जांभळे
 दरी-डोंगरास लागुनी विहरतो
 तोs  नभातूनी भरारतो
 अबोल पारवा निःसंग तो
 नभातूनी भरारतो….

{ पिवळ्याs कळ्यांफुलांस
 कुसुंबी केशरी सुवास  }  -  २
 मुसमुसते… सुख सोडून ;
 भगव्या क्षितिजावरती झेपावतो ;
 नभातूनी भरारतो
 अबोल पारवा निःसंग तो
 नभातूनी भरारतो….
 अबोल पारवा निःसंग तो
 कधी इथे कधी तिथे
 विलोलसा भरारतो
 तोs  नभातूनी भरारतो
 अबोल पारवा निःसंग तो
 नभातूनी भरारतो….

ऑडीओ डाऊनलोड लिंक - audio download link

त्या क्षणाला … बोलण्याचे .. टाळले होतेsस तू
मी दिलेsले फूल तरीsही माळले होतेस तू
मी दिलेलेsss , मी दिलेले गीत माझे ;
मी दिलेले गीत माझे वाचले नाही जरी …
( का पुन्हा ते ) -  २  पण वहीचेs चाळले होतेस तू ….
( आलाप  )

टाsळण्याचे वागणे कळते मलाs  -  २
( का.. अशी तू सारखी ) - २  छळते मला
टाळण्याचे वागणे कळते मलाs 

{  एकटीचे हे जिणे छळते मला  -  २
( तुच माझा सोबती ) -  २  कळते मला… } - फिमेल वॉईस

चांदणे तू माळूनी येता सखे
चांदणेs… चांदणेsss ….
चांदणे तू माळूनी येता सखे
पौर्णिमा ही , पौर्णिमा ही सावळी दिसते मला
पौर्णिमा ही सावळी दिसते मला
टाळण्याचे वागणे कळते मला

{ तू पुन्हा जातोस मजला टाळुनी  -  २
 नाs  कुणीही सोबती उरते मला - २
 एकटीचे हे जिणे छळते मला  }   -  फिमेल वॉईस

वाजते सनई तुझ्या दारापुढे
वाजतेs .. वाजतेss … वाजतेs
वाजते सनई तुझ्या दारापुढे
स्वप्न का हे सारखे पडते मला  -  २ 
टाळण्याचे वागणे कळते मलाs 
( का.. अशी तू सारखी ) - २  छळते मला

{  एकटीचे हे जिणे छळते मला  -  २
( तुच माझा सोबती ) -  २  कळते मला… } -  फिमेल वॉईस

ह्मं ह्मं ह्मं ह्मं ह्मंह ह्मं ह्मं - ४


ऑडीओ डाऊनलोड लिंक - audio download link

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers