कधी कसे कुठे भेटलो आपण - २
अजुनी वेचतो मी ते क्षण कण - २
कधी कसे कुठे भेटलो आपण - २
जरी एकटा मी भासे तुला ;
तुला आठविता नसे एकटा
गीत हे तुझे ; तुजलाच अर्पण - २
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण - २
अजुनी वेचतो मी ते क्षण कण - २
{ तुझा छंद जेंव्हा मला लागला,
तुझ्यावीण काही सुचेना मला } - २
शिशिरात बरसावा रिमझिमता श्रावण - २
अजुनी वेचतो मी ते क्षण कण - २
{ एक मी सांगतो तू ऐकून घे,
शब्द मी तुजला दिला हा गे } - २
यापुढचे सारे होतील क्षण सण - २
अजुनी वेचतो मी ते क्षण कण - २
कधी कसे कुठे भेटलो आपण - २
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
1 comments:
सुंदर कविता अगदी हृदयाला स्पर्श झाला
Post a Comment