28
September

बघ झुरवी तुला ...बघ झुरवी मला ... -  २
असा दुरावाsss  , असा दुरावा  का हवा…  सांग नाsss
बघ झुरवी तुला ... बघ झुरवी मला ...
असा दुरावा का हवा सांग नाsss
बघ झुरवी तुला ... बघ झुरवी मलाss

{ जाग जागुनीया आता मी अंबराला पाहतो...
 दाटती हृदयात ओळी चंद्र कोरा राहतो .... } -  २
हरवलेल्या भावनांचे स्वप्न डोळा पाहतो ...
उधाणलेल्या सागराला थांग नाsss  ...
बघ झुरवी तुला ... बघ झुरवी मला ...
असा दुरावा का हवा सांग नाsss
बघ झुरवी तुला ...बघ झुरवी मलाs  ...

{ संभ्रमाची वाट जाते पेटत्या रानातूनी ...
विरत जातो दाह सारा वाहत्या पाण्यातुनी ... } - २
सूर घेतो पोळलेला श्वास या गाण्यातुनी
कशी शमावी आग ही सांग नाsss ...
बघ झुरवी तुला ... बघ झुरवी मला ...
असा दुरावाsss  , असा दुरावा  का हवा सांग ना
बघ झुरवी तुला ...बघ झुरवी मला ...

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

28
September

{ वृन्दावनी सारंग हा , का लावी घोर जिवाला...
झाली अशी वेडी पिशी, कुणी जाउन सांगा त्याला.. } - २
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली  - २
कधी झर झर पाण्यातुन सुर सुर येती कानी ,
सा सा सा प प प म म प ध प म ग रे म प ,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम…
घे गौळण राधा - राधे कृष्ण राधे कृष्ण नाम - २

डोई वरती घागर घेउनी, जाई राधा नदी किनारी..
हळुच कुठुनसा येई मुरारी, बावरलेली होई बिचारी..
शब्द शब्द अवघडले, परी नजरेतूनच कळले - २
आज ऐकण्यादी तान होई अधीर अधीर,
मन सा सा सा प प प म म प ध प म ग रे म प ,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम….
घे गौळण राधा - राधे कृष्ण राधे कृष्ण नाम - २

गोड गोजिरी, मूर्त सावळी, प्रितीची तव रीत आगळी..
म्हणती सारे आज गोकुळी, राधामाधव नाही वेगळे
मनी चांदणे फुलते, पाहुनिया अपुले नाते
कधी येणार येणार श्याम रोखुनिया डोळे,
प्राण सा सा सा प प प म म प ध प म ग रे म प,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम…. 
घे गौळण राधा - राधे कृष्ण राधे कृष्ण नाम - २

{ वृन्दावनी सारंग हा , का लावी घोर जिवाला...
झाली अशी वेडी पिशी, कुणी जाउन सांगा त्याला.. } - २
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली  - २
कधी झर झर पाण्यातुन सुर सुर येती कानी ,
सा सा सा प प प म म प ध प म ग रे म प ,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम….
घे गौळण राधा - राधे कृष्ण राधे कृष्ण नाम - ४

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

28
September

तिच्या डोळ्यातलं गावं - ४

{ त्या गावाच्या वाट साऱ्या मोहरलेल्या ;
 तारुण्याच्या उंबरठ्याशी हुरहुरलेल्या } - २
पण नसतो सहजी पत्ता गवस तयांचा ;
भाग्यानेच कधी ये उमटुनी मनी नकाशा ,
शंभर मरणांच्या बोलीवर मिळतो याचा ठाव...
तिच्या डोळ्यातलं गावं - ३

{ मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे ;
 आणि कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे } - २
पाउल टाका सावध येथे अगणित चकवे ;
गावं असे डोळ्यांतून मोहक मनात फसवे ,
प्रवेश केवळ त्यांना झेलती जे प्राणावरती घाव ...
तिच्या डोळ्यातलं गावं  - ४

{ छाया नाही उन्हही नाही हवा सावळी ;
 वाऱ्यावरती सारंगाची धून कोवळी } - २
संथ धुके अंगाला बिलगून चालत असते
अन पक्षांचे हळवे अलगुज वाजत असते ,
झऱ्या झऱ्या परी सजल सहजसा होऊन जात स्वभावs  ...
तिच्या डोळ्यातलं गावं - ३

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

28
September

सारखा आभास होतो सांजवेळेला तुझाs
हे दिवे हे काजवे करती तुझ्या खाणाखुणाs
मन बोले हे नाही एकटा मी ;
तन सांगे तू माझ्या रोमरोमी
भासे मला तू बोलशी मज सजण सावरिया
हाय हाय पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखा आभास होतो सांजवेळेला तुझाsss

ही  तुझी चाहूल की ही झुळूक वा-याची
बोलते आहेस तू भाषाच मौनाची
मिटून घेतो पापण्या अन् पाहतो काही
माझिया डोळ्यापुढे चेहरा तुझा येई
पाहिले रुपात त्या नवरंग प्रेमाचे
हाय हाय पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखाs आभास होतो सांजवेळेला तुझाsss

टाकला जो तू उसासा श्वास तो माझा
ही अशी आहे तुझी माझ्याकडे ये-जा
मज इथे बेहोष करुनी गंध जो आहे
मी समजलो कि तुझी ही ओढणी आहे
खोवले मी फूल त्यावर अधीर हृदयाचे
हाय हाय पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखाs  आभास होतो सांजवेळेला तुझाsss
हे दिवे हे काजवे करती तुझ्या खाणाखुणाs
मन बोले हे नाही एकटा मी
तन सांगे तू माझ्या रोमरोमी
भासे मला तू  बोलशी मज सजण सावरिया
हाय हाय पसरुनी बाहू कधीचा मी उभा येथे
जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे
सारखाss  आभास होतो सांजवेळेला तुझाsss

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

28
September

तू माझी कल्पना ; तू माझी मनमोहीनी
जीव जडलाs .....  ये साथ दे ..... ये हात देs ....
तू माझी कामना ; तू माझी संवेदना
तूच आसराs ..... ये साथ दे ..... ये हात देs ....
तुझ्या सरी माझ्यावरी बरसू दे ..
झेलून त्या घेईन मी ... तुझी ओली शिरशीरी ;
रंगवुन मी तुला नवे रूप देईन मी ...
ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगमssss

तुजला आज वाटे मी तुझा
मजला हा दिलासा तू दिला
देशील साथ आता तू मला
मजला हा भरोसा लाभला
गुणगुणतो मी नव्याने
आशेच्या पालवीने
हातात तुझ्या स्पर्शांच्या पाकळ्या ... -  २
झेलून त्या घेईन मी ... तुझी ओली शिरशीरी  ;
रंगवुन मी तुला नवे रूप देईन मी ..
ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी ..
सरगमsss

वाटा दूर जाती घेउनी
तेव्हा तूच माझी सोबती
नसतो मी कधीही एकटाs 
माझी अंतरी तू भोवती
हे जीवन तूच सावर
भिरभिरते जे निरंतर
नजरेत तुझ्या भेटीच्या चांदण्या … - २
झेलून त्या घेईन मी ... तुझी ओली शिरशीरी ;
रंगवुन मी तुला नवे रूप देईन मी ...
ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी ..सरगमsss

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

28
September

{ वो वोउ वो ओ ओ ओ ऒ वो  - २
 वो वो वो } -२
सिकंदर बिलंदर अशी  ही दुनिया
जो लढतो जो भिडतो हि त्याची दुनिया
असा हा तुफानी असा आसमानी
तुला जोश जर पाहिजे - एक टक्कर तू दे जगाला
{ वो वोउ वो ओ ओ ओ ऒ वो  - २
  वो वो वो } - २


{ वो वोउ वो ओ ओ ओ ऒ वो  - २
वो वो वो } - २
{ जशी काल होती तशी आज नाही ही दुनिया महा बेरकी
कधी साथ देते कधी देते धोका ही नसते मनासारखी } -२
ही हेराफेरी खास समजून घे तू तुला जर हुनर पाहिजे ..
एक टक्कर तू दे जगाला एक टक्कर तू दे जगाला
{ वो वोउ वो ओ ओ ओ ऒ वो  - २
  वो वो वो } - २

{ कसे आज हे बेफान वारे दिशा त्यांची पाहून घे
इरादा तुझा आज बदलू नको तू हे आभाळ खेचून घे } - २
अशी एक संधी हि उंची बुलंदी
जिगर जर तुला पाहिजेsss
एक टक्कर तू दे जगाला
{ वो वोउ वो ओ ओ ओ ऒ वो  - २
  वो वो वो } - २

सिकंदर बिलंदर अशी ही दुनिया
जो लढतो जो भिडतो ही त्याची दुनिया
असा हा तुफानी  असा आसमानी
तुला जोश जर पाहिजे एक टक्कर तू दे जगाला
{ वो वोउ वो ओ ओ ओ ऒ वो  - २
 वो वो वो } - २


ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
ओ प्रिया आ आ आ …
एका एका नजरेचे
तीर तुझ्या डोळ्यांचे
झेलतो मी उरी
आता तरी हो राजी
आता तरी हो माझी
तूच माझी खरी
ओ प्रिया आ आ आ …
तुझी हि चाल तुझा तोरा ...
तुझा हा डौल नवा कोरा
बंदा तुझा मी खरा
यंदा जुळून येऊ दे
दोघांची रंगीत प्रेम कथा

सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
ओ प्रिया आ आ आ …

केले तुला मी राजीखुशी
तू ये ना जरा माझ्यापाशी
झालो आता मी वेडाखुळा
हो ना तूही वेडी जराशी
तारुण्य हे माझे नशिले
वय हे गुलाबी तुझे
ये देऊया ते एकमेका
दोघांस जे पाहिजे
तुझी हि चाल तुझा तोरा ...
तुझा हा डौल नवा कोरा
बंदा तुझा मी खरा
यंदा जुळून येऊ दे
दोघांची रंगीत प्रेम कथा

सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
ओ प्रिया आ आ आ

झालो तुझा मी आहे तुझा
हे बोलू तुला मी कितीदा
कळले तुला - मी मर्जी तुझी ;
तू आहेस माझा इरादा
बैचेन तू बेभान मीही
नाही कशाची कमी
आहे जसा दिलदार मी
अन तूही  तशी रेशमीss
तुझी हि चाल तुझा तोरा ...
तुझा हा डौल नवा कोरा
बंदा तुझा मी खरा
यंदा जुळून येऊ दे
दोघांची रंगीत प्रेम कथा

सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
ओ प्रिया आ आ आ
एका एका नजरेचे
तीर तुझ्या डोळ्यांचे
झेलतो मी उरी
आता तरी हो राजी
आता तरी हो माझी
तूच माझी खरी
ओ प्रिया आ आ आ …

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशा वेळी मज याद तुझी आली
ये ना....
मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

वर्षाव तुझ्या तारुण्याचा ;
रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे ;
चंदेरी माझ्यावरी लहरू दे
नाव तुझे माझ्या ओठांवर येते
फूल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते, अधुरा मी येथे
चांदरात ही बघ निसटून जाते
बांधीन गगनास झुला
जर देशील साथ मला
ये ना......

मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

हे क्षण हळवे, एकांताचे ;
दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी ;
रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तू मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला
दे आता हाक मला
ये ना......

मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September


{ गालावरी खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची

कधी कुठे कसा तुला सांग भेटू

वाट पाहतो मी एका इशा-याची

जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू

माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे } - २


you are the one who took his heart away he loves you,

thinks about you every night and day he loves you,

look the smile in his eyes through the lonesome eyes..

he's Waiting for the moment when you say.... I love you  
you are the one who took his heart away he loves you,
thinks about you every night and day
I love you , I love you , I love you…


कोणता हा मौसम मस्त रंगांचाs 

तुझ्यासवे माझ्या जीवनी आलाsss

सुने सुने होते किती मन माझे

आज तेच वाटे धूंद मधुशाला

{ जगण्याची मज आता कळते मजा

नाही मी कोणाचा आहे तुझा } - २

सांगतो मी खरे खरे -
तुझ्यासाठी जीव झुरे ,
मन माझे थरारे …

कधी तूझ्या पुढे पुढे ;
कधी तुझ्या मागे मागे -
करतो मी इशारे

हे जाऊ नको दूर तू…… 

जाऊ नको दूर तू , अशी ये समोर तू

माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे


होsss तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली

मला जिंदगी ही घेऊनी आली

तुझ्या चाहुलीची धुन आनंदी

अंतरास माझ्या छेडूनी गेली

{ जगण्याची मज आता येई नशा

तू माझे जीवन तू माझी दिशा} - २

आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगिरी

हुरहुर का जिवाला , बोल आता तरी काहीतरी

भेट आता कुठे तरी , कसला हा अबोला

हे जाऊ नको दूर तू ….

जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू

माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे


गालावरी खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची

कधी कुठे कसा तुला सांग भेटू

वाट पाहतो एका इशा-याची

जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू

माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

he loves you , he loves you


27
September

ये ये येना प्रिये तुजविण राहू कसे
श्वासातुनी हे उष्ण उसासे
जलद कधी हे मंद जरासे
तुज समजावू कसेsss 
ये ये येना प्रिये तुजविण राहू कसे
ये ये येना प्रिये तुजविण राहू कसे

तू अशीच येताना हासतील या कळ्या
रोजच्याच चांदण्या वाटतील वेगळ्या
तुझ्याविना माझे मला एकटे मी पाहू कसे
तुज समजावू कसेsss  
ये ये येना प्रिये तुजविण राहू कसे
ये ये येना प्रिये तुजविण राहू कसे

तुझ्या स्वागतास वारा मखमली स्वरातला
सागरास चांदण्यांचा वर्ख आज लागला
लाटांवरी आठवांचे फुटती हे मोती जसे
तुज समजावू कसेsss  

ये ये येना प्रिये तुजविण राहू कसे
श्वासातुनी हे उष्ण उसासे
जलद कधी हे मंद जरासे
तुज समजावू कसेsss

हे हे लालाला लाला लालाला
हे हे आहाहाहा … हं हं हं हं हं …

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

मन माझे हे -  ५
मन माझे झुरते फुलते
खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी …
होss मन माझे झुरते फुलते
खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी …
होऊनी तु साजणी
येशील का माझ्या घरीss
{ तु माझ्या अंतरी अंतरी …
लाटा जश्या सागरी सागरी …. } - २

तुझ्या केसात माळीन मी
तुला हवा तसा गजरा
माझ्यासाठीच हा सारा
तुझा तोरा तुझा नखरा
जीव तुझ्यावरी जडला - २
लय दिसतेस तु भारी
{ तु माझ्या अंतरी अंतरी ,
लाटा जश्या सागरी सागरी… } - २

हे रूप किती पाहू
बेचैन कसा राहु
तु हळव्या एकांती
दे तुझा हात हाती
आहेस तु कमाल  -  २
कुणी नाही तुझ्यापरी
{ तु माझ्या अंतरी अंतरी …
लाटा जश्या सागरी सागरी…}  -  २

मन माझे झुरते फुलते
खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी …
हो ss मन माझे झुरते फुलते
खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी …
होऊनी तु साजणी
येशील का माझ्या घरीss

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

{ कोण कुठली तु म्हणती काय ग तुला
 थांब तू जरा आणि सांग ना मला }   - २
मस्त ही मस्त ही चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठुनी अशी ख़ुशी
घुमत घुमत सागरात गाज ये जशी
त रा रा रू तारू तरारारू  - ४

येते लाट जाते लाट ; बघता बघता होते पहाट ….
नाही गोडी आणि कशात ; डोळा पाही तुझीच वाट ....
तु समोर आणि आज मी समोर हा उभा ….
आज प्रेम मागण्यास प्रियकरास दे मुभा …
मस्त ही चांद रात तु भरात मी भरात …
बघत बघत सागरास राहूदे असा ….
त रा रा रू तारू तरारारू   -    ४

कितीदा मी बघू आता , माडांमधल्या चंद्राला
पुसते लाट विरहाची वाळूवरल्या नावाला ….
चांदण्याच चांदण्या उमलती उरी जशा
का उगाच टाळते जाणुनी अशी दशा …
या अधीर पाखरास गाऊ दे तुझ्या स्वरात
चमक चमक चंद्र आज वाटू दे फिका ….
त रा रा रू तारू तरारारू -   ४

कोण कुठली तु म्हणती काय ग तुला
थांब तू जरा आणि सांग ना मला
मस्त ही मस्त ही चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठुनी अशी ख़ुशी
घुमत घुमत सागरात गाज ये जशी
त रा रा रू तारू तरारारू - ४

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

हि याद तुझी , भास पुन्हा
छळणार तुझी , आस पुन्हा
आहेस कुठे मी खिन्न इथे
चाहूल तुझी लागेल कुठे ;
{ डोळ्यांची ; स्वप्नांची ;
 ओठाची ; स्पर्शाची } - २

{ माझी नजर शोधी तुला
गर्दीत या मी एकला } - २
ओढ मनी थरथरते हो ,
ओढ मनी थरथरते ;
{ डोळ्यांची ; स्वप्नांची ;
 ओठाची ; स्पर्शाची } - २

हाक तुझी यावी आणि -  २
जीव माझा मोहरावा - २
हात हाती घेउनी तू - २
तोल माझा सावरावा - २
साथ तुझी मज तीच हवी होsss
साथ तुझी मज तीच हवी ;
{ डोळ्यांची ; स्वप्नांची ;
 ओठाची ; स्पर्शाची } - २

लालाला लालाला लालाला लालाला - २

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

हा तुझा ग ह्मं ह्मं खुलू लागला …
{ हा तुझा ग रंग रागिणी ,
 कणा कणाने खुलू लागला } - २

तुफान ओले ; रान डोले ;
सागराची गाज बोले -
आज तुझ्या ग सौंदर्याचा
सृष्टीला या साज नवा
{ हा तुझा ग रंग रागिणी ,
कणा कणाने खुलू लागला } - २

धिन ता धिन ता धिन ता नि धी ता नि ….

तू पाण्याचा ग रंग नवा
झुळूकीचे संगीत नवे
फुलाफुलाला आज पुन्हा
तुझे नव्याने गंध हवे
या क्षणाची वाट पाहून
फार सारे अधीर झाले
प्रत्येकाला आज नव्याने
नवा तुझा ग संग हवा
{ हा तुझा ग रंग रागिणी ,
कणा कणाने खुलू लागला} - २

तू वेळूमधला सूर नवा
हरूपाचे अस्तित्व नवे
दवबिंदू पानावरचा
तू पक्षांचे लक्ष थवे
स्पर्श सारे ; गंध सारे
नाद सारे ; रंग सारे
प्रत्येकाला आज नव्याने
नवा तुझा ग ढंग हवा
{ हा तुझा ग रंग रागिणी ,
कणा कणाने खुलू लागला} - २

तुफान ओले ; रान डोले ;
सागराची गाज बोले -
आज तुझ्या ग सौंदर्याचा
सृष्टीला या साज नवा
{ हा तुझा ग रंग रागिणी ,
कणा कणाने खुलू लागला} - २



ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

{ आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेउनी मी आलो } - २
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो ;
हृदयाला आशेचे तारे लावतोsss ….
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेउनी मी आलो

हेsss  आकाश चांदण्यांचे , हरखून पाहण्याचे
वाळूत लोळूनीया निःशब्द राहण्याचे
हे हे वा-यातल्या नशेने श्वासात वाहण्याचे
संगीत हे अनादि हृदयात ऐकण्याचे
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतो ….
{ आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेउनी मी आलो } - २

ही वेळ एकटयाने तंद्रीत चालण्याची
स्वप्नातल्या सुखांना सत्यात पाहण्याची
हे हे आकाश पांघरोनी चंद्रात नाहण्याची
आनंदुनी जगी या आंनद वाटण्याची
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतो ….
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेउनी मी आलो

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेउनी  मी आलो
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लावतोssss  ….

{ आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेउनी मी  आलो } - २


27
September

{ रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेss
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेss } -२
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होsई -
{ राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी } - 2


हिरव्याहिरव्या झाडांचीsss  पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनीsss  श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रितीचे कानी सांगून जाई
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होsई -
{ राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी }  - २

आज इथे या तरुतळीss , सूर वेणुचे खुणावती
तुजसामोरी जातानाss  उगा पावले घुटमळती
हे स्वप्‍न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी  साद ऐकुनी होsई -
{ राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी } - २

{ रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेss
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेss } -२
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होsई -
रा-धा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
{ राsधा ही बावरी, हरीsची राधा ही बावरी } - २
राsधा ही बावरी, हरीsची राधा ही बावरीssss



युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

27
September

आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या
होssss  अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलुकणारे ,
तारे किती हे सांग ना ….

किरणांच्या सरकती ;
रांगोळ्या कोणासाठी
का थेंब हे थिरकती ;
पागोळ्या होण्यासाठी …
साऱ्या खुणा कळतात या …. ;
माझ्या कडे वळतात या ….
होsss अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलुकणारे
तारे किती हे सांग ना …. 

उडती रे गगनी या ;
हे पक्षी कोणासाठी ….
पाण्यावरी तरंगते ;
ही नक्षी कोणासाठी …
दाही दिशा माझ्याच या ….
माझ्याच मी धुंदीत या ….
होsss अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलुकणारे
तारे किती हे सांग ना ….

{ आहे मजा जगण्यात या ,

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers