27
September

{ कोण कुठली तु म्हणती काय ग तुला
 थांब तू जरा आणि सांग ना मला }   - २
मस्त ही मस्त ही चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठुनी अशी ख़ुशी
घुमत घुमत सागरात गाज ये जशी
त रा रा रू तारू तरारारू  - ४

येते लाट जाते लाट ; बघता बघता होते पहाट ….
नाही गोडी आणि कशात ; डोळा पाही तुझीच वाट ....
तु समोर आणि आज मी समोर हा उभा ….
आज प्रेम मागण्यास प्रियकरास दे मुभा …
मस्त ही चांद रात तु भरात मी भरात …
बघत बघत सागरास राहूदे असा ….
त रा रा रू तारू तरारारू   -    ४

कितीदा मी बघू आता , माडांमधल्या चंद्राला
पुसते लाट विरहाची वाळूवरल्या नावाला ….
चांदण्याच चांदण्या उमलती उरी जशा
का उगाच टाळते जाणुनी अशी दशा …
या अधीर पाखरास गाऊ दे तुझ्या स्वरात
चमक चमक चंद्र आज वाटू दे फिका ….
त रा रा रू तारू तरारारू -   ४

कोण कुठली तु म्हणती काय ग तुला
थांब तू जरा आणि सांग ना मला
मस्त ही मस्त ही चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठुनी अशी ख़ुशी
घुमत घुमत सागरात गाज ये जशी
त रा रा रू तारू तरारारू - ४

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers