27
September

{ रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेss
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेss } -२
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होsई -
{ राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी } - 2

हिरव्याहिरव्या झाडांचीsss  पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनीsss  श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रितीचे कानी सांगून जाई
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होsई -
{ राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी }  - २

आज इथे या तरुतळीss , सूर वेणुचे खुणावती
तुजसामोरी जातानाss  उगा पावले घुटमळती
हे स्वप्‍न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी  साद ऐकुनी होsई -
{ राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी } - २

{ रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेss
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेss } -२
या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनी साद ऐकुनी होsई -
रा-धा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
{ राsधा ही बावरी, हरीsची राधा ही बावरी } - २
राsधा ही बावरी, हरीsची राधा ही बावरीssss

युटयुब विडीओ लिंक - you tube video link

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:

Post a Comment

About this blog

Pages

Powered by Blogger.

Followers